विविध मागण्यासाठी रेशनींग दुकानदारांचा वाईच्या तहसील कार्यालयावर मोर्चा .
वाई, प्रतिनिधी शुभम कोदे.:वाई तालुक्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसिलदार सोनाली मेटकरी यांना प्रलंबित असलेल्या विविध मागण्या आणि विविध अडचणी बाबत शासनाचे लक्ष वेधावे व शासनाकडून त्वरित कारवाही व्हावी यासाठी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रलंबित कमिशन वाढीचा प्रस्ताव त्वरित मंजूर होवून सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांचे धान्य वाटपाचे कमिशन लवकरात लवकर वाढवून मिळावे. सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांना मिळणारे धान्य वाटपाचे कमिशन दर महिन्याचे दिनांक ५ तारीखेचा अगोदर मिळावे. रेशन धान्य वाटपा बरोबर डाळ खाद्यतेल , साखर, इतर जीवण्यावश्यक वस्तू विक्रीस शासनाकडून मिळाव्यात. गोडावून मधून मिळणारे धान्य तसेच शहरी विभागात मिळणारे धान्य कमी वजनाचे येते ५० किलोच्या च्या पोत्यामध्ये येणारे धान्य कमी येते.५० किलोच्या पोत्यामध्ये येणारे धान्य ५०० ते ९०० किलो ग्राम
कमी येते सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांना सदरचे धान्य आमचे दुकानात येताना वजन करून मिळावे प्रत्येक पोते ५० किलो अधिक झूट ५०० ग्राम आणि प्लास्टिक २०० ग्रान प्रमाणे दुकानात वजन करून मिळावे. गोडावून मधून व थेट वाहतुकीद्वारे दुकानदार यांना येणारे धाण्याची पोती फाटकी येतात त्यामुळे वाहतुकीच्या वाहनामध्ये फाटक्या पोत्यातून मोठ्या प्रमाणात धान्य सांडते तसेच वाहनातून दुकानात पोहोच करताना रस्त्यावर आणि गाडीत मोठ्या प्रमाणात धान्य गळती होवून कमी येते तरी अशी फाटकी पोटी सुस्थितीत जागे वरूनच शिवून प्रमाणित करून मिळवीत. दुकानदार यांचे कडून धान्य वाटप करत असताना धान्याची सांड लावंड होत असते त्यामुळे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारयांना प्रती क्विंटल मागे १ किलो तुट मिळावी. तसेच सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांना शासनाने प्रत्येक शिधापत्रिका मधील सर्व लाभार्थ्यांची EKYC करणे सक्तीचे केले आहे तरी प्रत्येक EKYC मागे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांना योग्य तो मोबदला मिळावा.
तरी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मागण्यांचा सहानभूती पूर्वक विचार करावा.
व सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार यांना न्याय मिळावा. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष अनिल रामराव मांढरे व उपाध्यक्ष संजय गेनबा जायगुडे यांच्या सह्या आहेत.