अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » राज्यात मान्सूनने वेग पकडला

राज्यात मान्सूनने वेग पकडला 

राज्यात मान्सूनने वेग पकडला 

पुणे -महाराष्ट्र १४ दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा वेग पकडला आहे. आज कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी पुणेपर्यंत तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेडपर्यंत आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सून ने पुढे वाटचाल केली.

त्याचबरोबर मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेनेच तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला आहे. मान्सून पोहोचलेल्या वरील सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी मान्सूनचे वारे तेथपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असुन येत्या २-३ दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल, असे वाटते

पावसाळी हंगामात समुद्रसपाटीच्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पुर्वो-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. आज तो पंजाब हरियाणा ऐवजी राजस्थान बिहार उत्तरप्रदेश राज्यातून पास होत आहे. तसेच वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी. दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली विरळतेकडे गेली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली आहे.

राज्याच्या विविध भागात आज पावसाचे हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket