Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » मोळाचा ओढा येथे उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ना.शिवेंद्रराजेनी पुढाकार घ्यावा – श्रीरंग काटेकर

मोळाचा ओढा येथे उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ना.शिवेंद्रराजेनी पुढाकार घ्यावा – श्रीरंग काटेकर 

मोळाचा ओढा येथे उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी ना. शिवेंद्रराजेनी पुढाकार घ्यावा – श्रीरंग काटेकर 

मोळाचा ओढा येथील तिकाटणार्‍यावर अपघाताचा धोका उड्डाणपुलाची गरज 

सातारा शहरातील चौकाचौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असतानाच आता मोळाचा ओढा या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करणे अत्यंत गरजेचे झाले असून यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सातारकरांची स्वप्नपूर्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सातारा, पुणे ,जुना हायवेवरील एकेकाळी सातारचे प्रवेशद्वार समजले जाणारे काळाच्या ओघात अरुंद झाले आहे दररोज या मार्गावरून हजारो वाहने पुणे, मुंबई ,वाई तसेच मेढा, महाबळेश्वर, महाड कडे ये जा करीत असतात त्याचप्रमाणे या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नागरी वस्तीची त्यात भर पडली असल्याने मोळाचा ओढा येथील तिकाटणार्‍यावरून वाहने चालविणे वाहन चालकांना कठीण जात आहे त्यामुळे या मार्गावरून सुरक्षित प्रवासासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज भासू लागली आहे मुळात या परिसरात अरुंद रस्ते त्यात रस्त्याकडेला झालेली अतिक्रमणे यामुळे अरुंद रस्त्यावरून वाट काढीत वाहनचालकांना वाहने चालवावी लागत आहेत या परिसरात सुरक्षिततेचे कोणतेच उपायोजना न केल्याने या ठिकाणी दररोज अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात अपघाताची केंद्र बनू पहात असलेल्या या मार्गावर वाहतूक सुरक्षितेसाठी उड्डाणपुलाची उभारणी आवश्यक वाटत आहे.

सातारा कडून पुणे व अन्य शहराकडे जाण्याबरोबरच मेढा महाबळेश्वरकडे प्रवास करताना मोळाचा ओढा येथील तीव्र उताराचा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे येथे तीन रस्ते एकत्र येत असल्याने बऱ्याचदा मेढा,महाबळेश्वर कडून आलेली वाहने मुंबई पुण्याकडे आलेल्या वाहन चालकांना दिसत नाहीत विशेषता राञीच्या वेळी या परिसरात पूर्णपणे अंधार असल्याने वाहन चालकांना या तिकाटणार्‍यावरून वाहने चालवविणे कठीण जाते त्यात सातारा कडून वेगाने येणारे वाहने अनेकदा या तिखाटणार्‍यावर एकमेकांसमोर येऊन अपघात घडतात.

 -मोळाचा ओढा येथील तिकाटणार्‍यावर ना सिंग्नल यंत्रणा ना सुरक्षितेचे कोणतेच उपाय सगळा रामभरोसे कारभार असल्याने प्रत्येक वाहन चालकांनी स्वतःची काळजी घेऊन वाहने चालवावी लागतात देशातील व राज्यातील रस्ते अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पाहता असे मार्गच कारणीभूत ठरतात असे आढळून आले आहे नागरिकांची व वाहन चालकांची सुरक्षितता पाहता येथे उड्डाणपूलाचे नितांत गरज आहे.

 विकासाला नेहमी प्राधान्य देणारे सातारचे लोकप्रिय नेतृत्व ना. शिवेंद्रराजे भोसले आता सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आहेत त्यांच्याकडून या प्रश्नाची उखल व्हावी ही जनभावना आहे मोळाचा ओढा परिसरात वाहतूक व्यवस्था सुलभ व्हावी व नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी येथे उड्डाणपूल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घ्यावा ही सातारकरांची मागणी आहे.

                                  श्रीरंग काटेकर 

                              जनसंपर्क अधिकारी

                      गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 48 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket