Home » राज्य » कराड उत्तरमधील पुरसंरक्षक भिंतींसाठी 15.13 कोटी निधी मंजूर -आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तरमधील पुरसंरक्षक भिंतींसाठी 15.13 कोटी निधी मंजूर -आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तरमधील पुरसंरक्षक भिंतींसाठी 15.13 कोटी निधी मंजूर –आमदार मनोजदादा घोरपडे 

कराड -कराड उत्तर विधानसभा मतदार संघ हा संपूर्ण ग्रामीण भाग आहे. या ठिकाणी कृष्णा, तारळी, उरमोडी, उत्तर मांड या नदया जातात. या नदयांच्या प्रवाहामुळे नदी काठील गावांना व शेतकऱ्यांच्या शेतीला मोठया प्रमाणात नुकसान पोचत असते. ते टाळण्यासाठी त्याठिकाणी पुरसंरक्षक भिंती होणे गरजेचे होते. गावकऱ्यांच्या सातत्यपुर्ण मागणीनुसार व आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे कराड उत्तरमधील सहा गावातील पुर संरक्षक भिंती बांधण्यासाठी 15.13 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

 या पुर संरक्षक भिंतीमुळे जमिन खचण्याचे प्रमाण थांबणार असून त्यांचा फायदा शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात होणार आहे. तसेच पावसाळयामध्ये नदीचे पाणी वाढले असता ते शेजारील गावांमध्ये शिरून पुर स्थिती निर्माण होते. संरक्षक भिंतीचे काम मार्गी लागल्यामुळे पुर स्थिती उद्भवणार नाही. मौजे उंब्रज ता.कराड येथील कृष्णा नदीच्या उजव्या तिरावर स्मशान भूमीजवळ पुर संरक्षक भिंत बांधणे 4.71 कोटी, मौजे कवठे ता.कराड येथील कृष्णा नदीच्या उजव्या तिरावर स्मशान भूमीजवळ पुर संरक्षक भिंत बांधणे 2.70 कोटी, मौजे कोणेगाव ता.कराड येथील कृष्णा नदीच्या काठावर पुर संरक्षक भिंत बांधणे 2.46 कोटी, मौजे कालगाव ता.कराड येथील कृष्णा नदीच्या डाव्या तिरावर स्मशान भूमीजवळ पुर संरक्षक भिंत बांधणे 1.21 कोटी, मौजे वराडे ता.कराड येथील कृष्णा नदीच्या उजव्या तिरावर स्मशान भूमीजवळ पुर संरक्षक भिंत बांधणे 90 लक्ष, मौजे कोर्टी ता.कराड येथील कृष्णा नदीच्या काठावर पुर संरक्षक भिंत बांधणे 55 लक्ष मौजे टेबू येथील कृष्णा नदीवरपूर संरक्षक भिंत बांधणे 2.60 कोटी कामे मंजूर झालेली आहेत. या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 63 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket