Post Views: 69
म्होप्रेत यशस्वी विद्यार्थ्यांची गावातून काढली मिरवणूक
तांबवे, ता. २२ (स्व.) यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत बाल लघुनाटिका स्पर्धा प्रकारात म्होप्रेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांची रथातून मिरवणूक काढली.
बालनाट्यातील सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका दीपाली सरगडे, उपशिक्षिका दिलशाद मुल्ला व शीतल पाटील, सहायक शिक्षिका अश्विनी माने यांनी मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी, आनंदा धायगुडे, रामचंद्र संकपाळ यांनी अभिनंदन केले
