मेढा येथे उद्या शिवसेनेचा निर्धार मेळावा- एकनाथदादा ओंबळे शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख
मेढा (प्रतिनिधी)-जावळी तालुक्यातील शिवसेनेचा निर्धार मेळावा व शिवसेना नवी मुंबई च्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अंकुश बाबा कदम यांचा नागरी सत्कार जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या दुपारी चार वाजता मेढा येथे कलश मंगल कार्यालयात होणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथदादा ओंबळे यांनी दिली.

आगामी काळात येणाऱ्या मेढा नगरपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असून या निर्धार मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे. तरी या निर्धार मेळाव्यास शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जावळी तालुका शिवसेना, मेढा शहर शिवसेना, युवासेना, महिला संघटना, यांच्या वतीने करण्यात आले आहे.




