Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठान चे वतीने मोफत आरोग्य शिबीर

शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठान चे वतीने मोफत आरोग्य शिबीर      

शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठान चे वतीने मोफत आरोग्य शिबीर.                      

तांबवे –तांबवेत शहिद जवान युवराज पाटील सामाजिक सेवा प्रतिष्ठान व कृष्णा हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबवे या ठिकाणी मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिरात १८७ लोकांची तपासणी करून त्यांना औषध उपचार देण्यात आले. तांबवेतील शहिद जवान युवराज पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराचे उद्घाटन वेळी सरपंच जयश्री कबाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच ॲड.विजयसिंह पाटील, डॉ. प्रतिक पाटील, स्वा.सै.आण्णा बाळा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वास पाटील, कृष्णा हाॅस्पीटलचे सुनिल यादव यांचे उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत पाटील, विशाल पाटील, निलेश जाधव,सदानंद लोहार यांनी केले,प्रास्ताविक ॲड.विजयसिंह पाटील यांनी केले, आभार सुजय पाटील यांनी मानले. शिबिरात कृष्णाच्या वैद्यकीय पथकातील डाॅक्टरांनी शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले.कार्यक्रमास ग्रामस्थ, शिबिरार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket