अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » वीज कनेक्शन खंडित; झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, पाणी प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार-आ.मनोज घोरपडे

वीज कनेक्शन खंडित; झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, पाणी प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार-आ.मनोज घोरपडे

वीज कनेक्शन खंडित; झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, पाणी प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार-आ.मनोज घोरपडे

कृष्णा, उरमोडी, तारळी तसेच परिसरातील इतर नद्यांच्या पाणी वितरणाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेत कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शासनाकडे जोरदारपणे आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे.

सध्या नदीपात्रातील पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत पंपांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

याबाबत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे या प्रश्नावर जलसंपदा विभागाने सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

वीज कनेक्शन खंडित झाल्यामुळे नदीकाठच्या भागातील अनेक शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात आली आहेत. संबंधित विभागांनी तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत हा प्रश्न राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे आवाज उठविणार असल्याचा निर्धार आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket