मंजू इन्स्टिट्यूट सातारचा जलसा फॅशन शो 2025 येत आहे.
सातारा प्रतिनिधी – दर्जेदार शिक्षण आणि अल्पावधीतच करिअर घडविणारी मंजू इन्स्टिट्यूट सातारा पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असून हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाईनिंग, फॅशन डिझाइनिंग , गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझाईनिंग यासारखे सर्व आधुनिक कोर्सेस मंजू इन्स्टिट्यूट येते आहेत. मंजू इन्स्टिट्यूटमुळे हजारो विद्यार्थी आपले करिअर देश-विदेशामध्ये आकारास देत आहेत.
दरवर्षी मंजू इन्स्टिट्यूट सातारा वार्षिक फॅशन शो आयोजित करत असतात.जो विद्यार्थ्यांसाठी लाँचपॅड ठरला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे सर्जनशील करिअर सुरू करण्यास मदत होत आहे. या शोमध्ये फॅशन डिझायनिंगचे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही सर्वोत्कृष्ट डिझायनर वेअर कलेक्शन दाखवले जातात .जलसा फॅशन शो 2025 विविध मध्ये त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्याची एक अद्भुत संधी मिळते. या कार्यक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि नवोदित डिझायनर्सना फॅशन उद्योगासाठी तयार होण्यास मदत होते.
या वर्षी, जलसा फॅशन शो 2025 2 फेब्रुवारी रोजी कला वाणिज्य ग्राउंड सातारा येथे होणार असल्याची माहिती प्राचार्य अनिल चव्हाण यांनी दिली. सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.जगभरातील कलेतून प्रेरित अश्या एथनिक आणि फ्यूजन वेअरची ही विस्तृत श्रेणी पेंटिंग, प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, ऍप्लिक, मोटिफ्स, आर्किटेक्चर आणि बरेच काही वापरून तयार केली जाते.आजचे जग फॅशन आणि ट्रेंडबद्दल आहे. त्याच्या वाढत्या मागणीमुळे, फॅशन डिझायनिंग हा एक करिअर पर्याय बनला आहे ज्यामध्ये वाढीसाठी भरपूर वाव आहे.
