मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर; कोकण विभागाची बाजी, तर निकालात मुलींचेच वर्चस्व
पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, यंदाही निकालात कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. राज्याचा एकूण निकाल पाहता, मुलांच्या तुलनेत मुलींनी पुन्हा एकदा यशाची उंच भरारी घेतली आहे.
राज्यात विभागांनुसार निकालात मोठी तफावत पाहायला मिळाली.सर्वाधिक निकाल:कोकण विभाग (९४.१४%)सर्वात कमी निकाल:लातूर विभाग ८४.१४% मुलींची चमकदार कामगिरी यंदाच्या निकालात मुलींनी मुलांवर मात केली आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९३.१५% इतकी आहे, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ८६.८०% आहे.विशेष म्हणजे, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे.
एकूण ५९,८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १८,३४९ विद्यार्थी ३६.४४% उत्तीर्ण झाले आहेत.३६,९४१ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यातील २९,६३४ विद्यार्थी (८०.२१%) यशस्वी झाले आहेत.राज्यात ८,३६७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७,५७९ (९०.५८%) विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि सचिव डॉ. दीपक माळी यांच्यासह इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकता.




