गरवारे परिवाराचा वाईच्या विकासामध्ये मोठा सामाजिक वाटा
वाई प्रतिनिधी शुभम कोदे.दि. २६ : गरवारे परिवाराचा वाईच्या विकासामध्ये माेठा सामाजिक वाटा आहे. गरवारे कपंनीचे राेजगाराबराेबरच सामाजिक कार्यात फार माेठे याेगदान आहे, असे गाेराेवदगार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
गरवारे टेक्निकल फायबर्स लि. कंपनी यांच्या सामाजिक उपक्रमातुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास *वाई-महाबळेश्वर बस थांबा* याचे लाेकार्पन साेहळा संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणुन बाेलत हाेते. याप्रसंगी गरवारे टेक्निकल फायबर्स लि. कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, फित कापून व काेनशिलेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रबोध कामत, हेड-ह्यूमन कॅपिटल रावेंद्र मिश्रा, व्हॉईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते दिपक आेसवाल, विभाग वाह. अधिकारी, रा. प. सातारा विभाग श्रीमती ज्योती गायकवाड, वाई आगार प्रमुख श्रीमती स्वाती बांद्रे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
प्रारंभी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते वाहन नियंत्रण कक्षाच्या चावीचे हस्तांतरण श्रीमती ज्योती गायकवाड व श्रीमती स्वाती बांद्रे यांना करण्यात आले. यावेळी प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी प्रबोध कामत, हेड-ह्यूमन कॅपिटल रावेंद्र मिश्रा, व्हॉईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते दिपक आेसवाल यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
आ. पाटील पुढे म्हणाले, गरवारे हे नाव उद्याेग क्षेत्राबराेबर सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. कपंनीने बनविलेल्या उत्पादनांना जगामध्ये मागणी आहे. परंतु गरवारे परिवाराने महाराष्ट्रातील छाेट्या छाेट्या शहरांमधे सामाजिक कार्य केले आहे. यामधून त्यांची सामाजिक बांधिलकी जाेपासल्याचे दिसते. गरवारे परिवाराने वाईकरांसाठी एक सुंदर असा बस थांबा बांधून दिला आहे. अशा प्रकारचा बस थांबा आपणास काेठे ही दिसणार नाही. गरवारे परिवाराने निर्माण केलेला बस थांबा वाईच्या वैभवात नक्कीच भर टाकेल. याबद्दल वाईकर नक्कीच ऋणी राहतील. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेसाठी बांधून दिलेल्या सुंदर बस थांबा याची सांभाळण्याची जबाबदारी अधिकार्यांची आहे.
विवेक कुलकर्णी म्हणाले, गरवारे परिवाराचे प्रमुख वायु गरवारे यांनी व्यावसायाबराेबरच सामाजिक कार्यासाठी फार माेठे याेगदान दिलेले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून वाई शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये भरघाेस काम गरवारे कंपनीने केलेले आहे. महाबळेश्वर ला जाणार्या प्रवाशांसाठी बस थांबा नव्हता, त्यांची गैरसाेय हाेत असून त्यासाठी बस थांबा बांधून देण्यासाठीचे पत्र महामंडळाकडून मिळाले. वायु गरवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता या सामाजिक उपक्रमासाठी हाेकार दिला, व आज या बस थांब्याचा हस्तांतरण हाेत आहे. या पूर्वीही वाईच्या सामाजिक विकासात व अर्थव्यवस्थेमध्ये गरवारे कपंनीचे माेठे याेगदान प्रामाणिक दिले आहे. सामाजिका, क्रिडा, आराेग्य विषयक क्षेत्रामध्ये गरवारे परिवारानेने अनेक उपक्रम या वाई शहरामध्ये राबविले आहेत. यापुढील काळामध्ये बाई ब्युटिफिकेशन हा माेठा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामध्ये वाई शहराच्या सुरुवातीला असणार्या आंबेडकरनगर ते संभाजी महाराज चाैका पर्य़ंत शुशाेभिकरण करण्यात येणार आहे. वाईच्या इतिहासातील हा सर्वात माेठा सामाजिक उपक्रम गरवारे कंपनीच्या वतीने राबविला जाणार आहे. यापुढेही गरवारे परिवार वाईकरांच्या सामाजिक कार्यात नक्कीच याेगदान देईल.
दिपक आेसवाल यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचलन केले. आगार प्रमुख स्वाती बांद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अंशुमन जगदाळे, सुनील पानसे, अविनाश भाेसले, प्रियंका भिलारे, माेहन फडके, महेश पवार, अक्षय शिंदे यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास गरवारे कंपनीचे अधिकार महेंदर रुद्रारापू, चंद्रशेखर भदाणे, सचिन कुलकर्णी, गुरुदत्त सपर, प्रशांत कुलकर्णी, युनियन अध्यक्ष सुधीर नवसरे, सचिव दादासाहेब काळे व गरवारे कामगार युनियन प्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी वैभव कांबळे, रूपाली कदम, किरण धुमाळ, सुरेश सावंत, जितेंद्र खैते, अजय जाधव, चरण गायकवाड, विशाल गाडे, सुभाष जमदाडे, मामा देशमुख, नितीन मांढरे, नरेश सुरशे तसेच प्रवाशी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.