Home » गुन्हा » पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलिसांवरच मोठी कारवाई! दोन अधिकाऱ्यांचे निलंबन!

पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलिसांवरच मोठी कारवाई! दोन अधिकाऱ्यांचे निलंबन!

पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी पोलिसांवरच मोठी कारवाई! दोन अधिकाऱ्यांचे निलंबन!! काय आहे  पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येरवड्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अपघाताबाबतची माहिती वरिष्ठ आधिकारी आणि कंट्रोल रूमला न दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर या अपघातानंतर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात आता निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठांना आणि कंट्रोल रूमला न कळवल्याने मोठी कारवाई केली आहे.

हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शेने चिरडले, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला.न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन सुधारगृहात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket