यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी-शिक्षक गहिवरले
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडले तरी त्यांना या शिक्षणसंस्थांबद्दल आपलेपणा व प्रेम असते. संस्कारमय वयात कॉलेजात बराच काळ घालविल्यामुळे तेथील शिक्षकवर्ग, एकंदरित वातावरण, मित्रपरिवार आणि अनेक कार्यक्रमातील सहभाग यामुळे या स्मृती सर्वांनाच जिव्हाळ्याच्या व आनंददायी वाटतात.अशा अनेक आठवणीना उजाळा देत यशोदा टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ फार्मसी येथे माजी विद्यर्थी मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडला.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी औषध उद्योग, संशोधन ,विकास, शिक्षण, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक यासारख्या विविध क्षेत्रातकार्यरत आहेत .यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली आहे. या संस्थे मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमितपणे फार्मा क्षेत्रातील विकास,उद्योग जगातील हालचाली तसेच औषध निर्माण शास्त्र मध्ये करियर गायडन्स अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाते
महाविद्यालयाचे संचालक – प्राचार्य डॉ.व्ही.के.रेदासानी यांनी या मेळाव्याचे चे महत्व सांगितले त्यांनी प्रत्येक उपस्थितांना यशोकनेक्ट मालिकेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा योगदानाबद्दल सत्कार केला.न्यू मेडिकल शॉप स्टार्टअप या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रथम माजी विद्यार्थिनी कु. पूजा अर्जुन जगताप यांचा सत्कार करण्यात आला.प्रा.डॉ.एस.एच.रोहणे यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या .कॉलेज मधून मिळालेले मार्गदर्शन , पाठबळ यामुळेच आपण या पदावर आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर दुपारी रेनफॉरेस्ट रिसॉर्ट मध्ये सर्वानी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला.सदाबहार संगीत ,नृत्य या समवेत पावसाने दिवसाच्या सौंदर्यात भर घातली. संस्थापक अध्यक्ष प्रा दशरथ सगरे व उपाध्यक्ष प्रा अजिंक्य सगरे याच्या मार्गदर्शनIखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला समन्वयक प्रा पी. बी. कदम, प्रा. ए. आर. सगरे. यांनी उत्तम कामगिरी बजावली.