महाराजांची भेट म्हणजे आनंदच असतो -मंत्री श्री.मकरंद(आबा )पाटील
महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.मकरंद पाटील यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
सातारा -राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.मकरंद पाटील यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री झाल्याबद्दल नामदार श्री.मकरंद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नामदार मकरंद पाटील हे माझे जवळचे मित्र असून मित्र माझ्या घरी आला मला खूप आनंद झाला असे खासदार उदयनराजे म्हणाले. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि मा.शरद पवार यांनी तरुणांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी नामदार मकरंद पाटील म्हणाले महाराज साहेबांची भेट नेहमीच आनंददायी असते, महाराज साहेबांचे आभार नामदार मकरंद पाटील यांनी मानले. याप्रसंगी श्री सुनील काटकर, श्री नितीनबापू भरगुडे पाटील, श्री.महादेव मस्कर, श्री. सुधीर यादव, श्री. गजानन चवरे, श्री धनाजी साळुंखे, श्री संग्राम बर्गे उपस्थित होते.