महाबळेश्वरमध्ये जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा; नाट्य कलाकारांचा विशेष सत्कार
महाबळेश्वर: २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त महाबळेश्वरमध्ये नाट्य कलाकारांचा गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा महाबळेश्वर यांच्या वतीने हॉटेल सनी इंटरनॅशनलच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात महाबळेश्वरचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांच्या हस्ते नटराजाच्या पूजनाने झाली. याप्रसंगी, ज्येष्ठ रंगकर्मी डी.एम. बावळेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे, प्रभाकर देवकर, संतोष आबा शिंदे, ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, नाट्य परिषद महाबळेश्वरचे कोषाध्यक्ष विलास काळे, ज्येष्ठ रंगकर्मी किसनराव खामकर, वृषाली डोईफोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात, नाट्य शिवप्रतिष्ठान आणि नाट्यकर्मी संस्थेतील ४० कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, डी.एम. बावळेकर यांनी नाट्य संवर्धनाविषयी आपले विचार व्यक्त केले. हा दिवस नाट्य क्षेत्रातील कलाकारांसाठी महत्त्वाचा असतो.नाट्यकलेचे महत्त्व जगभर पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.विविध संस्कृतींमधील नाट्य प्रकारांची ओळख होते.नाट्यकलेच्या सामाजिक आणि आर्थिक योगदानाविषयी जागरूकता वाढते. महाबळेश्वरमधील नाट्य कलाकारांचा गौरव करण्यात आला.
नाट्य संवर्धनाविषयी चर्चा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.नाट्यकलेच्या सांस्कृतिक विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात रोहिणी वैद्य, सौ. देशपांडे, लिलाताई शिंदे, वेदिका ढेबे, शिरीष गांधी, दत्तप्रसाद जाधव आणि शहरातील व ग्रामीण भागातील नाट्य कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले आणि विलास काळे यांनी आभार मानले.
