महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे पाचगणी पालिकेचा अतिरिक्त कार्यभार
महाबळेश्वर: पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पदोन्नतीने बदली झाल्याने रिक्त पदावर महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे पाचगणी पालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पदोन्नतीने राजरा नगरपरिषद, चंद्रपर या ठिकाणी बदली झाली आहे. सद्य स्थितीत पाचगणी पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पदावर कोणतीही पदस्थापना झाली नसल्याने हे पद रिक्त होते. या पदावर पदस्थापना होईपर्यंत प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने योगेश पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे त्यांनी मंगळवारी पाचगणी पालिकेत जाऊन कार्यभार स्वीकारला.
