Home » राज्य » शिक्षण » महाबळेश्वर तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर: सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यात इयत्ता ४ थी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न झाली. तालुक्यातील १० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला तालुक्यातील ११३ जिल्हा परिषद शाळांमधील ४१६ विद्यार्थी (इ. ४ थी) आणि २०९ विद्यार्थी (इ. ७ वी) उपस्थित होते.  महाबळेश्वर, पांचगणी, भिलार, कुंभरोशी आणि तापोळा या ठिकाणी परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती.

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश होता.सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी यशवंत भांड आणि गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी एन.के. धनावडे, केंद्रप्रमुख संजय पारठे, दगडू ढेबे, नामदेव धनावडे, विनायक पवार, चंद्रकांत जंगम, आनंद सपकाळ, तालुका समन्वयक संतोष ढेबे आणि संतोष चोरगे यांनी परीक्षा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

या परीक्षेमुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होईल आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket