महाबळेश्वर तालुका: सातारा जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त तालुका
महाबळेश्वर: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वर तालुका सातारा जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त शाळांचा तालुका ठरला आहे.
या कामगिरीसाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. राहूलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा सल्लागार डॉ. दिव्या परदेशी, गटविकास अधिकारी यशवंत भांड, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे आणि गावागावांतील शाळांमध्ये जाऊन नऊ निकषांची पूर्तता करून घेणाऱ्या विशेष शिक्षिका पूनम घुगे, सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रशांत उबाळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नऊ निकषांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांचे फळ म्हणजे महाबळेश्वर तालुका तंबाखूमुक्त झाला आहे.या यशाबद्दल तालुका समन्वयक पूनम घुगे यांचा विशेष सत्कार गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते करण्यात आला.
या मोहिमेत सलाम मुंबई फाउंडेशन तसेच पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव धनावडे, केंद्रप्रमुख संजय पारठे, दगडू ढेबे, एन.डी. धनावडे, विनायक पवार, चंद्रकांत जंगम, आनंद सपकाळ, विशेष शिक्षक सचिन चव्हाण, श्रीनिधी जोशी, कुलदीप अहिवळे, अभिजीत खामकर, भास्कर कोळी तसेच ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथील गोकुळ जनार्धन मंत्रे एनसीडी समुपदेशक व मोनाली अरुण शिर्के या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.
