महाबळेश्वर शहर शिवसेनेचे नगरपालिकेस निवेदन; शववाहिनी तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी
महाबळेश्वर : शहरात गेल्या वर्षभरापासून शववाहिनी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने महाबळेश्वर नगरपालिकेस निवेदन देण्यात आले.
शहरात दुःखद घटना घडल्यास मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी कोणतीही अधिकृत शववाहिनी नसल्याने नातेवाईकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना तात्काळ शववाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. किमान एका आठवड्याच्या आत शहरासाठी शववाहिनीची व्यवस्था करावी, अन्यथा पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी विजयभाऊ नायडू राजेंद्र पंडित,राहुल साळुंखे,सचिन गुजर,सचिन ओतारी,वर्षा आरडे,सुनीता,पूजा उतेकर,सचिन ओतारी,प्रभा नायडू उपस्थित होते.
निवेदन देताना नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक संतोष(आबा)शिंदे, नगरसेवक संतोष आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.




