माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची आढावा बैठक पार पडली
पुसेगाव प्रतिनिधी :आज सातारा शासकीय विश्रामगृह याठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी माण, खटाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी बैठकीत उपस्थित मुद्दे येरळवाडी तलाव वनक्षेत्र संवर्धनातून वगळण्यात यावा.धोंडेवाडी येथील वन विभागाच्या जागेवरील नसलेल्या घरावर होणारी कारवाई न करण्याबाबत चर्चा झाली.येरळवाडी तलावात दुष्काळ परस्थिती निर्माण झाली तर त्यामध्ये कशा पद्धतीने पाणी सोडता येईल यावर सकारात्मक चर्चा झाली.माण तालुक्यातील लाभ क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी पाणी सोडण्याबात चर्चा.यावेळी मा.प्रभाकर देशमुख, मा.सुरेंद्र गुदगे, मा.नंदकुमार मोरे,मार्केट कमिटी उपसभापती मा.विजयराव शिंदे, मा.अर्जुनभाऊ खाडे, व संबंधित खात्याचे आधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.