Home » गुन्हा » मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेला लोणंद पोलिसांनी केली अटक

मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेला लोणंद पोलिसांनी केली अटक

मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेला लोणंद पोलिसांनी केली अटक

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)लोणंद ता. खंडाळा येथे घरात घुसून दिव्यांग महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला लोणंद पोलिसांनी अटक केली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. ११ रोजी मनोज शरद घुले रा. जाधवआळी, लोणंद ता. खंडाळा यांनी लोणंद पोलीस ठाणेत येवुन तक्रार दिली की, ते राहत असलेल्या घरामधुन त्यांची दिव्यांग आई प्रेमा घुले हया घरात एकटया असताना एका अनोळखी महीलेने घरात येवुन त्यांचे गळ्यातील सोन्याचे ५०,०००/- रु. किमतीचे पाऊन तोळा वजनाचे मनी मंगलसुत्र जबरीने हिसकावुन चोरुन नेले आहे. अशी तक्रार केल्याने लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांर्भीर्य लक्षत घेऊन मा. पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले सहा. पोलीस निरिक्षक व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर गुन्हयातील आरोपी महिलेस वय ३५ निष्पन्न करुन तिच्याकडे महिला पोलीसांमार्फत कसुन चौकशी केली असता तिने गुन्हा केलेचे कबुल केले. सदर महीलेस अटक करुन तिच्याकडुन चोरी केलेले ५०,०००/- रु. किमतीचे पाऊन तोळा वजनाचे मनी मंगलसुत्र हस्तगत करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पो.हवा संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, अभिजित घनवट, अमोल जाधव तसेच महीला पोलीस हवालदार शुभांगी धायगुडे, आशा शेळके यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सातारा यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket