लोखंडी ग्रील तुटल्याने वर्ये पुलावरून प्रवास बनला धोकादायक
सातारा- सातारा पुणे जुन्या हायवेवर असलेल्या वर्ये पुलावरील लोखंडी ग्रील हे बरेच दिवसापासून तुटलेले असल्याने वाहने नदीपात्रात कोसळण्याचा धोका आता निर्माण झाला आहे या मार्गावरून वाहनांची व नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणचे लोखंडी ग्रीलचे नादुरुस्त झालेले काम त्वरित करावेत अशी वाहन चालक व नागरिकांची मागणी आहे मुळात या पुलावरून प्रवास करताना अनेक समस्याना वाहन चालकांना सामना करावा लागतो मुळात हा पूल अरुंद आहे त्यातच संरक्षक म्हणून उभ्या केलेल्या लोखंडी ग्रील तुटल्याने आता तो धोका अधिकच वाढला आहे वाहनांची धडक होऊन हे लोखंडी ग्रील तुटल्याने वाहन चालकांना या मार्गावरून वाहने काळजीपूर्वक चालवावी लागतात सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून या पुलाचे रुंदीकरण करावे अशी बऱ्याच दिवसापासून नागरिक व वाहनचालकांची मागणी आहे संबंधित यंत्रणेचे या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते अनेकदा या मार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडवत असून मनुष्यहानी होत आहे.
चौकट – वेण्णा नदीवर ब्रिटिश कालीन असलेला पूल काळाच्या ओघात आता अरुंद झाला आहे वाहनांची वाढलेली संख्या तसेच या परिसरात वाढलेली नागरी वस्ती यामुळे या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच या भागात अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचीही ये जा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात आहे सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने या पुलाच्या रुंदीकरण व सुरक्षित उपाय योजनेकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
-
अनेक महिन्यांपासून या पुलावरील लोखंडी ग्रील तुटल्याने इथून प्रवास करताना वाहन चालकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे सातारा शहरात येण्यासाठी हा मार्ग वाहन चालकांना व नागरिकांना सोयीचा असल्याने या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे परिणामी या पुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना संबंधितांनी करून देणे गरजेचे आहे वास्तविक सततच्या डांबरीकरणामुळे या पुलावरील रस्त्याची उंची ही वाढलेली आहे त्यामुळे अगोदरच या पुलावरील संरक्षक असलेली भिंत उंचीने कमी झाली आहे लगतच लोखंडी ग्रील तुटल्याने रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असल्याने वाहन चालकांना ते कळून येत नाही परिणामी वाहने नदीपात्रात कोसळण्याचा धोका अधिक बळवला आहे.
-
श्रीरंग काटेकर सातारा.




