फलटण तालुक्यातील दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा १० तासांच्या आत उलगडा करुन आरोपीस जेरबंद करण्यात पोलीसांना यश !
दि. २५/०४/२०२४ रोजी सकाळी ०६.१५ वा. चे सुमारास निंभोरे, ता. फलटण गावचे हद्दीत पालखीमहामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे वय २० वर्ष व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके वय ३५ वर्ष दोघे रा. सुंदरनगर, निभोरे, ता. फलटणू यांचे मृतदेह रस्त्याचे कडेला मिळून आल्यावर लागलीच पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोघांच्या छातीवर धारदार व टोकदार भोकसल्यामुळे त्यातुन रक्तस्त्राव झाल्याचे दिसुन आले. सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती हे नात्याने सख्खे बहीणभाऊ आहेत. त्या दोघांचे खुन अज्ञात व्यक्तीने केला म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ५२०/२०२४, भा. दं. सं. कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. निंभोरे, ता. फलटण हे गाव पुणे-पंढरपूर पालखीमहामार्गालगत असुन सदर घटनेचे ठिकाण देखिल सदर महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ आहे. घटनास्थळावर काहीही धागेधोरे नसताना पोलीसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केल्यानंतर असे निष्पन्न झाले की, मयत स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हीने दोन वर्षापुर्वी तिचा पहिला नवरा कनव-या भिम-या पवार रा. वाळवा, जि. सांगली यास सोडुन देऊन रणजित मोहन फाळके, मुळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा याचेबरोबर तिच्या आईवडीलांजवळ झोपडीमध्ये राहत होती. सदरची घटना घडले रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता. परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तेथुन पलायन केले होते. पोलीसांनी त्यास सातारारोड, ता. कोरेगाव येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला दिशाभुल करणारी माहिती सांगितली. परंतु पोलीसीखाक्या दाखवताच त्याने दि. २५/०५/२०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास शीतल ही झोपेतून उठुन परपुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकु घेऊन तिच्या मागोमाग गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठुन तिच्या छातीवर चाकु खुपसुन तिचा खुन केला. त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे, असे समजुन त्याने त्याच्याही छातीत चाकु खुपसुन त्याचाही निघृण खून केला आहे. आरोपी रणजित मोहन फाळके, वय ४५ वर्ष यास अटक केली आहे.