Home » राज्य » शेत शिवार » किसन वीर-खंडाळा’ पुर्ण ताकतीने चालविणार नितीन पाटील; मील रोलर पुजन उत्साहात

किसन वीर-खंडाळा’ पुर्ण ताकतीने चालविणार नितीन पाटील; मील रोलर पुजन उत्साहात

किसन वीर-खंडाळा’ पुर्ण ताकतीने चालविणार नितीन पाटील; मील रोलर पुजन उत्साहात

भुईंज, दि.८/७/२०२४ : किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्यास नुकतीच केंद्र-राज्य शासन व एनसीडीसी बँकेच्या माध्यमातून अनुक्रमे ३५० व १५० कोटी रूपयांचे कर्ज मंजुर झालेले आहे. सभासद शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने कारखाना आमदार मकरंदआबा पाटील व संचालक मंडळाच्या ताब्यात दिला. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ न देता, कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता, दोन्ही हंगाम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. आमदार मकरंदआबांच्या प्रयत्नातुन एनसीडीसीमार्फत कर्ज मंजुर झाल्याने सभासदांबरोबर आमच्या संचालक मंडळास नविन ऊर्जा मिळालेली आहे. त्यामुळे किसन वीर व किसन वीर-खंडाळा पुर्ण ताकतीने व जोमाने चालविणार असल्याचे प्रतिपादन, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन पाटील यांनी केले.

 

किसन वीर साखर कारखान्याचे सन २०२४-२५ हंगामातील मील रोलरचे पुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, बावधन तालुका सुतगिरीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

नितीन पाटील पुढे म्हणाले की, दोन वर्षापुर्वी कारखान्याची सुत्रे ताब्यात आल्यानंतर यापुर्वीच्या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचार व भोंगळ कारभारामुळे कारखान्यावर प्रचंड कर्ज व आर्थिक देण्यांचा डोंगर निर्माण झाला होता. कारखान्याच्या गोडावुनमध्ये डॅमेज झालेली साखर, मोलॅसेस शिल्लक होते त्यावर प्रोसेस करून त्यापासुन अल्कोहोल तयार केले. स्क्रॅप विक्री या सर्वांमधुन कारखान्यास फक्त ८ कोटी ५० लाख रूपये मिळाले. तीन महिन्यांत कारखाना सुरू करण्याचे मोठे दिव्य आमच्यासमोर होते. यातुन मार्ग काढण्यासाठी एकच मार्ग दिसत होतो. तो म्हणजे काहीही करून कारखान्याचे भाग भांडवल वाढविणे. त्यासाठी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व संचालक मंडळाने कार्यक्षेत्रामधील गावोगावात फिरून भाग भांडवल वाढविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. सभासदांनीही मकरंदआबा व संचालक मंडळाच्या हाकेला धावत, विश्वास ठेवत व कारखान्याप्रती आपले प्रेम दाखवत सुमारे ३० कोटी रूपयांची रक्कम उभी केली. जी संस्था बुडालेली होती, ती संस्था वाचविण्याचे काम किसन वीरच्या सभासदांनी केलेले आहे, या गोष्टीचा आमच्या संचालक मंडळास सार्थ अभिमान वाटत आहे. अजुनही काही सभासदांचे शेअर्स अपुर्ण असून ते लवकरात लवकर पूर्ण करून कारखान्याचे नेटवर्थ प्लस करण्यास सहकार्य करण्याबाबत आवाहन केले. यंदाच्या हंगामातील ऊस बीलाची रक्कम देय असून ती बीले लवकरात लवकर देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. सध्या बाजारपेठेतील साखरेचे भाव कमी जास्त होत असल्यामुळे हा विलंब होत असून कोणत्याही शेतकऱ्यांचा एक रूपया बुडणार नाही याची खात्री बाळगावी. एनसीडीसीमार्फत ही कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर आपल्या सर्वांचा विश्वास व सहकार्यामुळे येणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या कालखंडामध्ये किसन वीर कारखान्यास पहिले दिवस येणार असल्याची गॅरंटी मी देतो, अशी खात्रीही यावेळी त्यांनी दिली. एनसीडीसीमार्फत ५०० कोटींची मदत मिळणेकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार व सहकार मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांच्यामुळेच हे शक्य झालेले आहे. यासाठी आमदार मकरंदआबा पाटील यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, चिकाटी व प्रयत्नामुळेच याला यश मिळाल्याचे सांगितले. या मिळणाऱ्या मदतीमुळेच आपण सर्व संकटातुन बाहेर पडणार आहोत. सभासद व कामगारांच्या विश्वासावरच गळीत हंगाम २०२४-२५ करिता आपण दोन्ही कारखान्याचे मिळून १० लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. ऊस उत्पादकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला परिपक्व झालेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास घालण्याचे आवाहनही यावेळी श्री. पाटील यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीडीसीद्वारे ५०० कोटी मंजुरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांचा यथोचित सत्कार कारखान्यामार्फत करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील हे अधिवेशन सुरू असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहु शकले नाहीत.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कारखान्याचे माजी संचालक नारायणराव शिंदे, तोडणी वाहतुक संस्थेचे चेअरमन बबनराव साबळे, अजय कदम, अरविंद कदम, शशिकांत भोईटे, मदन भोसले, महादेव मसकर, मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव, संचालक रमेश गायकवाड, तानाजी कचरे, दिपक बाबर, मनिष भंडारी, कुमार बाबर, मधुकर भोसले, नारायण नलवडे, नितीन निकम, संतोष पिसाळ, लालासाहेब भिलारे, शंकरराव गाढवे, अजय कदम, अजय भोसले, गणेश बाबर, अमृत गोळे, गिरीश कऱ्हाडे, राम पोळ, संदिप बाबर, विजय शिंगटे, बाळासो शिंगटे, दिपक जाधवराव, कार्यक्षेत्रातील विविध संस्थांमधील चेअरमन, संचालक, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

आमदार मकरंदआबा पाटील यांचे प्रयत्न व नितीनकाकांच्या योग्य नियोजनामुळेच ५०० कोटी मंजुर प्रमोद शिंदे

किसन वीर कारखान्याची सुत्रे ताब्यात घेतल्यानंतर कारखान्याची स्थिती भयावह होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे त्यावेळीही आपणांस आशा होती की, यातुन बाहेर पडण्याचा मार्ग निघेल. परंतु त्यावेळी ते शक्य झाले नाही. मध्यंतरीच्या काळात महायुतीचे सरकार आले. कारखान्यासाठी मकरंदआबांनी मंत्रीपदही धुडकावले. नंतरच्या काळात कारखान्याच्या भवितव्यासाठी ना. अजितदादांच्या पाठीशी उभे रहावे लागले. त्यानंतरच्या काळातच आपल्याला मदतीची ही प्रकिया अधिक गतीने होत गेली. परंतु या सर्व गोष्टींसाठी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांचे अतोनात प्रयत्न तर होतेच परंतु त्याबरोबरच जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या योग्य नियोजनामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket