Home » राज्य » शेत शिवार » किसन वीर’ च्या साई केंद्रासाठी होणार मल्लांची निवड चाचणी

किसन वीर’ च्या साई केंद्रासाठी होणार मल्लांची निवड चाचणी

किसन वीर’ च्या साई केंद्रासाठी होणार मल्लांची निवड चाचणी

दि : २८/ ३/२५: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावरील साई (स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडिया) केंद्रातील प्रवेशासाठी गुरूवार व शुक्रवार (दि.३ व ४ एप्रिल) सकाळी दहा वाजता कार्यस्थळावरील कुस्ती केंद्रामध्ये मल्ल निवड चाचणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

किसन वीर साखर कारखान्यावर साईचे अधिकृत केंद्र असून दरवर्षीं केंद्र शासनामार्फत निवड झालेल्या मल्लांना मानधन व स्पोर्टस् किटस दिले जाते. यावर्षीं ही निवड चाचणी गुरूवार व शुक्रवारी कारखाना साईटवर होणार असून निवड चाचणीसाठी भारतीय खेल प्राधिकारणाचे संचालक यांच्या देखरेखीखाली मल्लांची निवड होणार असून अनुभवी कुस्ती प्रशिक्षक परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या चाचणीत निवड झालेल्या मल्लांना किसन वीर कारखान्याच्या साई केंद्रामध्ये शास्रीय आणि तंत्रशुध्द मार्गदर्शकांकडून प्रशिक्षित केले जाणार आहे. कारखाना कार्यक्षत्रातील शेतकऱ्यांची मुले मल्लविद्येमध्ये कुशल होण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ संपुर्ण सहकार्य करणार असल्याचेही यावेळी श्री. शिंदे यांनी सांगितले.

कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील चौदा वर्षाखालील मल्छांसाठी ही निवड होत असून इच्छुक मुलांनी शाळेचा जन्मतारखेचा दाखला, वैद्यकिय दाखला, आधारकार्ड व झेरॉक्स, जिल्हास्तरीय मुलांनी शाळेचा पातळीवरील प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट साईज फोटो व कुस्तीसाठी लागणारे साहित्य आदी माहितीसह या दिवशी निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी कारखाना कुस्ती मार्गदर्शक राजेद्र कणसे (९२७००७८५ २४) यांच्याशी संपर्क साधून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्यवस्थापनाच्यावतीने प्रमोद शिंदे यांनी केलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket