Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर व खंडाळा कारखान्याचे सोमवारी मील रोल पुजन

किसन वीर व खंडाळा कारखान्याचे सोमवारी मील रोल पुजन

किसन वीर व खंडाळा कारखान्याचे सोमवारी मील रोल पुजन

सातारा -भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या सन २०२५-२६ मील रोलरचे पुजन सोमवार (दि.७) रोजी खंडाळा कारखान्याचा सकाळी १० वाजता तर किसन वीर कारखान्याचा दुपारी ३ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिमा नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने आर्थिक गर्तेंत सापडलेले किसन वीर व खंडाळा कारखान्याचे मागील तीन हंगाम यशस्वी केले. कोणत्याही प्रकारचे वित्तसहाय्य न घेता शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर कारखान्याची उंचावलेली प्रतिमेमुळे किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने लवकरच नावारूपाला येणार असल्याचा आत्मविश्वासही आमच्या संचालक मंडळाला असल्याचे म्हटले आहे.

सन २० २५-२६ च्या मील रोल पुजन समारंभासाठी किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket