Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबीर

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबीर 

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबीर 

सातारा, दि. १४ : खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरुवारी, १७ एप्रिल रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे येत आहेत. या शिबिरात नवीन रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होणार आहे.

कमी वेदना, कमीत कमी रक्तस्त्राव, कमीत कमी नुकसान, जलद रिकव्हरी या वैशिष्ट्यांमुळे रोबोटिक सर्जरी उपयुक्त ठरली आहे. या सर्जरी मधील तज्ञ डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की,पारंपरिक शास्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ऍडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. विशेष म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

डॉ. गिरी हे रुग्ण तपासणीसाठी १७ एप्रिल रोजी 12 ते 4  सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार सातारा येथे उपलब्ध आहेत. नवीन नांव नोंदनी केलेल्या शिबिरार्थी करिता मोफत आहे. फॉलअपसाठी येणाऱ्या रुग्णांना फेर तपासणी शुल्क आहे.

ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket