Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ

खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ 

खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ 

केंद्र सरकारने संसद सदस्य (खासदार) आणि माजी संसद सदस्यांच्या वेतन, दैनिक भत्ता, पेन्शन आणि अतिरिक्त पेन्शनमध्ये वाढ अधिसूचित केली आहे. ही वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाने म्हटले आहे.

संसदीय कामकाज मंत्रालयाने दिलेल्या पत्रात संसद सदस्यांचे वेतन आणि माजी संसद सदस्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. तसेच खासदारांचे मासिक वेतन १ लाखांवरून १ लाख २४ हजार रुपये करण्यात आले आहे. म्हणजे एकूण २४ हजार रूपयांची वाढ झाली आहे. तर दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे. माजी संसद सदस्यांच्या मासिक पेन्शनमध्येही वाढ झाली आहे. ती २५ हजार रुपयांवरून ३१ हजार रुपये करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket