आंबेघर येथील श्रीविठ्ठलधाम प्रतिपंढरपूर येथे कार्तिकी एकादशी सोहळा उत्साहात साजरा होणार
मेढा (प्रतिनिधी)-आंबेघर तर्फे मेढा ता.जावली येथे उभारलेल्या श्रीविठ्ठलधाम प्रतिपंढरपुरमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षिही रविवार दि.०२ रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे महापूजा,भजन,व कीर्तन असे विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरनात साजरे होनार आहेत.
या सोहळ्याचा जिल्ह्यातील भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीविठ्ठलधामचे प्रमुख प्रवीण महाराज शेलार यांनी केले आहे.जावली तालुक्यासह जिल्ह्यातील भक्ताना इच्छा असताना देखील शेतीच्या कामामुळे पंढरपुरला जाने शक्य होत नाही.भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्या भागातच घेता यावे याकरीता विठ्ठलधामची उभारनी केली आहे.या दिवशी श्रीविठ्ठलधामला जिल्ह्यातुन विविध गावातुन पायी दिंडी सोहळे येनार आहेत.तसेच कार्तिकी एकादशी निमित्त पहाटेची महापुजा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या शुभहस्ते संपन्न होनार आहे.
दुपारी भजनसम्राट मिलिंद महाराज ढम यांचे भजन व सायं ०६ वाजता ह. भ. प प्रवीण महाराज शेलार यांचे कीर्तन होनार आहे व सोमवारी (ता:३) द्वादशी निमित्त रविंद्र महाराज लोहार यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होईल.




