जिल्हयात अदानीच्या स्मार्ट मीटर जोडणीच्या काम बंद
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या प्रयत्नांना यश
सातारा- मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश देऊन सातारा जिल्हयात अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर जोडणीचे काम सुरुच होते ते न थांबल्यास 7 एप्रिल रोजी महावितरण अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरणवादी कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी दिला होता. त्याची दखल घेत महावितरणच्या अभियंत्यांनी स्मार्ट मीटर जोडणीचे काम बंद करत असल्याचे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे श्री. मोरे यांच्या आणखी एक आंदोलनाला यश आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणच्यावतीने स्मार्ट मीटर जोडणीचे काम अदानी एनर्जी सोल्युशन, अहमदाबाद यांना शासनाने दिले होते. परंतु त्याबाबत तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोडणीचे काम थांबवत असल्याचे लेखी आदेश दिले होते. तरीही सातारा जिल्हयात हे काम सुरुच होते. सिंधुदुर्ग, गडहिंग्लज याठिकाणी स्मार्ट मीटर जोडणीचे काम बंद झाले होते. सातारा जिल्हयातील स्मार्ट मीटर जोडणीचे काम अदानी कंपनीला तात्काळ स्थगित करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी केली होती. काम न थांबवल्यास 7 एप्रिल रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याबाबत जिल्हाधिकारी, महावितरणला निवेदनही दिले होते.
या इशा-याची दखल घेत महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी अदानी स्मार्ट मीटर योजनेचे काम बंद केल्याचे कळवले आहे. तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची कुठलीही सक्ती करण्यात येत नसून फक्त ग्राहकाच्या मागणीनुसारच जुने बंद पडलेले मीटर बदलण्याचे काम सुरु असल्याचे लेखी पत्र दिले. त्यामुळे श्री. मोरे यांच्या आणखी एक आंदोलनाला यश आले आहे.
