जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी केले परेड ऑफ प्लॅनेट चे निरीक्षण केले
कराड प्रतिनिधी –जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसण,कासार शिरंबे,कराड नगरपरिषद शाळा,विठामाता विद्यालय कराड या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना परेड ऑफ प्लॅनेट चे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अवकाशामधील ‘प्लॅनेटरी परेड’ ज्याला प्लॅनेटरी अलाइनमेंट’ देखील म्हणतात, ही एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. यामध्ये एकापेक्षा जास्त ग्रह पृथ्वीच्या समांतर रेषेत असल्याचे दिसते. जेव्हा सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला असतात तेव्हा असे संरेखन घडते. सदरची घटना सुर्यास्तानंतर थोड्यावेळाने आकाशात पहावयास मिळणार आहे. भारतात शुक्र, मंगळ, गुरु, शनि, नेपच्यून आणि युरेनस हे सहा ग्रह एकाच येळी आकाशात एकारेषेत दिसणार आहेत
सदर खगोलीय घटना पहाण्याची दुर्मिळ संधी कराड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहे.आपणास मिळाला आहे. दिनांक 21, 22 व 23 जानेवारी या कालावधीत ही खगोलिय घटना सायंकाळी 8.00 ते 8.30 या वेळेत पहाण्यात आली.काही शाळेच्या मोकळ्या मैदानावरुन अथवा उंच ठिकाणावरून विद्याथ्यर्थ्यां सह त्यांच्या पालकांसह एकत्र करून ही खगोलीय घटना दाखवण्यात आली आहे.
या वेळी सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यही उपस्थित होते. यातील चार ग्रह हे फक्त डोळ्याने दिसतील मात्र इतर दोन ग्रह पहाण्यासाठी दुर्बिणीचा वापर करण्यात आला.यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर पूर्णवेळ थांबून त्यांना या घटनेबाबत मार्गदर्शन ही केले.
विद्यार्थ्यांना परेड ऑफ प्लेनेट या अवकाशातील खगोलीय घटनेचा लाभ जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाला आहे हा उपक्रमा मुळे विद्यार्थ्यांना खगोलीय घटनेचा लाभ मिळाला आहे .
बिपिन मोरे
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कराड.
