Home » राज्य » जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला

जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला 

जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला 

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सांगली शहरातील माळी गल्ली परिसरात सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून भिडे गुरुजी घरी निघाले होते. त्यावेळी अचानक भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेतला. भिडे गुरुजी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर धारकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न

Post Views: 14 संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न महाबळेश्वर-सातारा आणि रायगड जिल्ह्यातील संत

Live Cricket