जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई
सातारा – राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेनं मीडियासमोर येऊन जयकुमार गोरेवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मात्र त्या आधीच या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सदर प्रकरण मिटविण्यासाठी या महिलेने 3 कोटींची खंडणी मागितली होती त्यापैकी तिने 1 कोटीची रक्कम स्वीकारताना तिला सातारा सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना आपण यावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, यातून अजूनही अनेक बाबी समोर येतील असे सांगितले आहे.
