यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी चा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड कौशल्य विकसित करता यावी यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी, सातारा येथे प्रतिष्ठित फार्मास्युटिकल उद्योगांपैकी एक आहे.
उद्योग तज्ञांकडून प्रशिक्षण, व्यावसायिक सॉफ्ट स्किल, कौशल्य विकास, उद्योग प्रोटोकॉलनुसार मॉक इंटरव्ह्यू, यासारखे अनेक उपक्रम इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी च्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये राबविले जातात.
यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी च्या ३० विद्यार्थांनी इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी मधून हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. ६ महिन्यांच्या ट्रैनिंग कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना क्वालिटी कंट्रोल ,क्वालिटी अशुरन्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ,फार्मास्युटिकल्समधील संशोधन ,उत्पादन पर्यवेक्षक, ऑपरेटर – सूत्रीकरण, सूक्ष्मजीवशास्त्र विश्लेषक,मेडिकल कोडींग,अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले .
यशोदा टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर व प्राचार्य डॉ. रेंदासनी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली . इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी चे मॅनेजिन्ग डायरेक्टर डॉ अजित एकल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी विभागप्रमुख डॉ अविनाश भागवत यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्सहन दिले व विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला. सर्टिफिकेट वितरण कार्यक्रमात विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त करून हा कोर्स आपल्याला किती फायदेशीर ठरला हे सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा अजिंक्य सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रा आर पी देवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
