वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)महाबळेश्वर परिसरातील जमिनी तुटपुंजा किमतीने धनदांडगे लोक खरेदी करत आहेत याविषयी सखोल चौकशी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना:-आमदार मकरंद पाटील
सातारा: वाई विधानसभा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांनी झाडानी जमीन खरेदी प्रकरण आणि महाबळेश्वर येथील अगरवाल यांचे अनधिकृत हॉटेल यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत जे सर्वसामान्य लोकांची भूमिका ती माझी पण आहे या भागातील लोक डोंगरदऱ्यामध्ये राहणारे असून या लोकांकडून तुटपुंजा किमतीने जमिनी खरेदी केला जातात. आणि धनदांडगे लोक या ठिकाणी येऊन चुकीच्या गोष्टी करतात. यामुळे या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी दिली.तसेच वेळे ता.वाई येथील राष्ट्रीय महामार्गावर नव्याने होऊ घातलेला बायपास बोगदा वेळे गावठाण,गुळुंब,चांदक,आनंदपुर रस्ता व सोळशी ता.कोरेगाव या गावतील ग्रामस्थ यांची कायमस्वरूपी प्रचंड गैरसोय होणार आहे याबाबबत सदर गावांच्या ग्रामस्थांनी गैरसोय दुर व्हावी याबाबत आ.मकरंद आबा पाटील यांची भेट घेवुन गाराने मांडले.यावर आ.मकरंद आबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संपर्क साधून सदर गावांची गैरसोय दुर करावी असे सांगितलें.
