पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक फिरोजभाई पठाण यांची अधिकाऱ्यांना सूचना; नागरिकांना लवकर पाणी देण्याच्या सूचना
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाहूनगर योजनेअंतर्गत नवीन ४०० मिमी जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ६ ते ९ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी जलवाहिनी जोडणीचे काम दर्जेदार व वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत, नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच काम पूर्ण होताच पाणीपुरवठा तातडीने सुरू करून नागरिकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
फिरोजभाई यांनी नागरिकांनाही काही काळ पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर योजना पूर्णत्वाकडे येत असल्याचा पाठपुरावाही करण्यात येत आहे.





