अवैध व्यवसायां विरोधात आंदोलन करणाऱ्या बापूसाहेब लांडगे यांचा अज्ञाताने पेटवला मंडप
कराड : कराड तालुक्यातील अवैध व्यवसायांविरोधात विश्व इंडिया पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कराड तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्री सुरू आहे. तसेच मटकाही घेतला जात आहे. अवैध व्यावसायिकांविरोधात आवाज उठवल्यानंतर संबंधितांकडून दमबाजी केली जाते. दम देण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु केले असता आंदोलनासाठी तयार करण्यात आलेला मंडप अज्ञाताने जाळण्यात आला असल्याची धक्कादायक घटना कराड येथे घडली आहे.
कराड शहर व तालुक्यातील अवैध व्यवसायांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे. सदर झालेल्या घटनेचा पोलीस प्रशासन कशा पद्धतीने छडा लावणार याचे सातारा जिल्हावासियांना कोडे पडले आहे.
