उद्योजकांना खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई
सातारा : सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पावले उचलली आहेत. उद्योजकांना खंडणी मागून अशांतता निर्माण केल्यास संबंधित प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली.
या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, साताराचे उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, पाटणचे पोलीस उपअधीक्षक सोपान टोम्पे, माणच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ,जिल्हा कामगार अधिकारी नितीन कवले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे उपस्थित होते
