Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड येथे मान्यवर कांशीरामजींना अभिवादन

कराड येथे मान्यवर कांशीरामजींना अभिवादन

कराड येथे मान्यवर कांशीरामजींना अभिवादन

कराड प्रतिनिधी :बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांना कराड येथे अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीचे माजी शहराध्यक्ष किरण थोरवडे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना किरण थोरवडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश — ‘जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं आहे’ — हा संदेश मान्यवर कांशीरामजींनी प्रत्यक्षात उतरवला. उत्तर प्रदेशात त्यांनी बहुजन समाजाला सत्तेचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बहन कुमारी मायावतीजी आज देशभरात बहुजन समाजाचं नेतृत्व करत आहेत.”

दत्तात्रय दुपटे यांनीही कांशीरामजींच्या संघर्षमय कार्याचा उल्लेख करून त्यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव नितीन थोरवडे, माजी जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, विद्याधर गायकवाड, संजय कांबळे, राजकुमार लादे सर, सुनील थोरवडे, प्रभाकर थोरवडे, विकास लादे, मिलिंद कांबळे, किशोर आठवले, किशोर थोरवडे, सूर्यकांत थोरवडे, सत्यजित थोरवडे, सुनील लादे, भाऊ लादे, भारत थोरवडे, सुरज लादे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमातून मान्यवर कांशीरामजींच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाची उजळणी करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 57 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket