Post Views: 76
हिंदूराव पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला
सातारा : पाटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व काँग्रेस सदस्य हिंदुराव पाटील यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाने स्वीकारले असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा प्रभारी श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांच्याकडे हिंदुराव पाटील यांनी राजीनामा स्वीकारावा अशी मागणी केली. त्यानुसार सदरचे राजीनामे पक्षाच्यावतीने स्वीकारण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पुढील कार्यवाहीसाठी हे राजीनामे प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी माहिती दिली.
