Home » राज्य » शिक्षण » हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

सातारा : उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आज (१५ जून) शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी आज शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचं शिक्षकांनी औक्षण करत अनोख्या पध्दतीने स्वागत केले.

शासनाच्या परिपत्रकानुसार श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या शाहुपूरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आजपासून नियमित वर्ग सुरू झाले. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तकं, नवीन मित्र, जुन्या मित्रांची भेट, चिमुकल्यांना पहिल्या दिवशी शाळेत सोडण्यासाठी आलेले पालक, अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेचा परिसर गजबजला होता. शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसंच चित्रांनी सजवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.

पारंपारिक स्वागताची सुरुवात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी नम्रतेने, आदराच्या भावनेने विद्यार्थ्यांचे पाय धुऊन केली. या कृतीने मुलांना पवित्रता व निरागसतेचे स्वरूप कृतीतून दिसून आले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कपाळावर टिळा लावून विद्यार्थ्यांचे आवारात स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. क्रीडा शिक्षक विनोद दाभाडे व गौरव माने यांनी विद्यार्थ्यांकडून शपथ विधी केला. विद्यार्थ्यांनी प्रार्थना, राज्यगीत, राष्ट्रगीत म्हटले. दिवसभर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. या स्वागत समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, अश्‍विनी कुलकर्णी, रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापक मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket