Home » ठळक बातम्या » “सहा महिन्यांपासून संततधार; जावलीतील शेती जलमय, शेतकरी उघड्यावर”

“सहा महिन्यांपासून संततधार; जावलीतील शेती जलमय, शेतकरी उघड्यावर”

सहा महिन्यांपासून संततधार; जावलीतील शेती जलमय, शेतकरी उघड्यावर”

मेढा (प्रतिनिधी) – मे महिन्यापासून सुरु झालेला पाउस थांबायचे नाव घेत नसून गेल्या सहा महिने जावलीतील शेतकऱ्याच्या शेतात व डोळ्यात सध्या पाणी दिसत आहे . ही बाब शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी पालक मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या लक्षात आणून देत सरकार दरबारी आवाज उठवून विषेश बाब म्हणून जावलीतील शेतकयांना मदत मिळवून द्यावी व दिलासा द्यावा . असे सांगितले यावर ना देसाई यांनी तात्काळ जावलीचे तहसिलदार हणमंत कोळेकर यांना फोन करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून याबाबत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्याशी संपर्क साधावा .                          

 याबाबत अधिक माहिती देताना एकनाथ ओंबळे म्हणाले , आजू बाजूच्या तालूक्यात ओला दुष्काळ जाहिर झाला पण जावलीत संततधार पाऊस पडूनही अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही म्हणून वगळण्यात आहे हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे . मे महिन्यात सुरु झालेल्या पावसाने वरखड जमिनीत योग्य मशागत व वाफसा न आल्याने हायब्रीड, सोयाबीन, कडधान्य, भुईमूग, नाचणी इ . पिके पेरताच आली नसल्याने बहुतांश जमिनी पडून आहेत . जून महिन्यात थोड़ी फार उघडीप मिळाल्यावर शेतकऱ्यांनी इतर खरीप पिकाबरोबरच भात शेतीत पेरणी करून पुर्नलागण केली परंतू संततधार पावसाने परत उघडीप दिली नसल्याने व पुरेसा सुर्य प्रकाश न मिळाल्याने भात पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन त्यावर करपा , तांबेरा पडून पिके पिवळी पडली . यानंतर या रोगराईतुन वाचलेले थोड़े फार भातपीक पदरात पडेल या आशेवर शेतकरी होता परंतू एकीकडे वन्यप्राण्यांचा सुळसुळाट तर वरून पडणारा संततधार पाऊस गेल्या सहा महिने झाले तरी उघडीपीचे नाव घेत नाही .यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होताना दिसत आहे .         

 जावली तालुक्यातील केळघर , केडंबे , मेढा , वेण्णा दक्षिण विभाग व डोंगर माथ्यावरील शिवारात मुख्यतः भात पिक घेतले जाते . सतत पडणाऱ्या पावसामुळे उरले सुरले भात पदरात पडण्याच्या वेळी वरून पाऊस व दुसरी कडून वन्यप्राण्यांचा त्रास त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून याबाबतचे पंचनामे करण्यासाठी पालकमंत्री ना देसाई यांनी महसूल विभागाला सूचना दिल्या असल्याची माहिती व अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे पंचनामे करण्यात काही अडचण असल्यास एकनाथ ओंबळे यांच्याशी संपर्क साधावा . असे आवाहन ओंबळे यांनी केले आहे .

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 66 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket