ज्ञानाशीला प्ले स्कूल येत्या चार-पाच वर्षांत जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण करेल- रोहिणी ढवळे
सातारा : “साताऱ्यातील अनेक शाळांमध्ये फक्त मुलांना शिक्षण दिले जाते, मात्र ज्ञानाशीला प्ले स्कूलमध्ये मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाते,” असे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी काढले.
त्या ज्ञानशीला प्ले स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व कृतज्ञता समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. “ज्ञानाशीला प्ले स्कूल येत्या चार-पाच वर्षांत जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करेल,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला बालरोगतज्ज्ञ डॉ. किरण सुशीलकुमार घार्गे, स्कूल कमिटीचे अध्यक्षा विमल पाटील, स्कूल प्रमुख स्नेहल पाटील, तसेच माजी सैनिक संदीप नलवडे यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. किरण घार्गे म्हणाल्या, शाळा म्हणून पालकांनी ज्ञानशीला प्ले स्कूलची निवड करून मुलांच्या यशाच्या शिखरात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रमुख पाहुण्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विमल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक स्नेहल पाटील यांनी तर आभार फल्ले यांनी मानले. समारंभाची सुरवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरमनी झाली.
