Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गुरुवर्य उथळेच्या निधनाने सातारच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे सावट

गुरुवर्य उथळेच्या निधनाने सातारच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे सावट

गुरुवर्य उथळेच्या निधनाने सातारच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे सावट

सातारा – सातारचे क्रिडावैभव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते गुरुवर्य बबनराव (आण्णा) उथळे यांचे 25 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाची छाया पसरली आहे गुरुवर्य उथळे यांनी क्रीडा क्षेत्राच्या उत्कर्षासाठी भरीव कामगिरी करून सातारचा नांवलौकिक राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविले त्यांच्या आजवरच्या क्रिङा कार्याचा गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी घेतलेला एक आढावा…

 राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्‌डी, खो-खो, वेटलिफ्टिंग खेळाडू निर्माण करणारे शिवछत्रपती पुरस्कार, विजेते गुरुवर्य बबनराव उथळे हे खेळाडूंसाठी चालते बोलते क्रीडा विद्यापीठ 98 व्या वर्यामध्येही त्यांचा उत्साह दांडगा होता क्रीडा क्षेत्रात खेळाडूंचा विकास हाच ध्यास घेऊन आयुष्यभर क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेले गुरुवर्य बबनराव उथळे क्रीडाप्रेमी आणि खेळाडूच्या हृदयात स्थान प्राप्त केले . क्रीडा महर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांनी खऱ्या अर्थाने क्रीडांगणाची सेवा करून अनेक खेळाडूंना घडविले आहे सुदृढ व बलशाली युवाशक्ती हाच ध्यास घेऊन वाटचाल करणारे गुरुवर्य बबनराव उथळे यांनी श्री शिवाजी उदय मंडळाच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे ध्यैर्य, साहस’ जिदद चिकाटी बरोबर समतेचा समभावाचा व ऐक्याचा मंत्र हा क्रीडा संस्कृतीतूनच वाढविणाऱ्या गुरुवर्य बबनराव उथळे यांनी संपूर्ण आयुष्य क्रीडांगणासाठी वाहून सातारच्या क्रीडा परंपरेला वैभव प्राप्त करून दिले  

मन मेंदू आणि मजबूत मनगटाची मशागत झाल्याशिवाय समृद्ध समाज रचना निर्माण होणार नाही याची जाणीव ठेवून आपले संपूर्ण, आयुष्य क्रीडा क्षेत्राशी एकनिष्ठ राहून गुरुवर्य बबनराव उथळे यांनी क्रिडांगणाची सेवा केली सातारचे क्रीडा क्षेत्राचे स्थान देशपातळीवर निर्माण करण्यामध्ये गुरुवर्य बबनराव उथळे यांचे मोलाचे योगदान आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्यसेनानी लोकनेते बाळासाहेब देसाई, राजमाता स्वर्गीय सुमित्राराजे भोसले श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले, ऐक्यकार स्वर्गीय सुरेश पळणिटकर यांनी अखंडपणे त्यांना साथ दिली. उत्तम क्रीडा संघटक व मार्गदर्शक म्हणून संपूर्ण राज्यभर गुरुवर्य बबनराव उथळे यांना ओळखले जात होते सातारची क्रीडा परंपरा अखंडपणे जोपासणाऱ्या या क्रीडा महर्षीनी अनेक दिग्गज कबड्डीपटू तयार केले संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे क्रीडा क्षेत्रातील कार्य गुरुवर्य बबनराव उथळे यांनी केले आहे क्रीडांगणाची अखंडपणे निस्वार्थ व निरपेक्ष भावनेने सेवा करीत खेळाडूचे जीवन खऱ्या अर्थाने फुलविले शिवाजी उदय मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीची दखल राज्य सरकारने घेऊन यांना सन 1984-85 साली उत्तम क्रीडा संघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरविले होते नेहमीच खेळाडूंच्या सहवासात राहणारे गुरुवर्य बबनराव उथळे हे खेळाडूंसाठी दैवत ठरले आहेत.

त्यांनी मैदानी खेळाच्या प्रसारासाठी मंडळाच्या क्रीडांगणावर अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खो-खो स्पर्धेचे आयोजन करून सातारच्या क्रीड़ा परंपरा वाढवली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण झाले आहेत त्यामध्ये विशेषता शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, कुमार कुलकर्णी, सुभाष मेहेंदळे, कै. डॉ. नरेंद्र दाभोळकर सौ उज्वला माने- साळुंखे व आंतरराष्ट्रीय धावपटू सुलताना खान याचबरोबर अनेक राष्ट्रीय खेळाडू गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाले.

 सातारच्या मातीचा गुणधर्मच काही आगळावेगळा आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत समर्थ रामदास स्वामींनी बलशाली संस्कृती उभी केली त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कविवर्य बा.सी मर्ढेकर महात्मा ज्योतिबा फुले यांनी संस्कार संस्कृतीचे बीजेरोपण करून येथील समाज रचना घडविली या संस्काराला शारीरिक तंदुरुस्तीची जोड देण्यासाठी क्रीडा परंपरेचा वारसा गुरुवर्य बबनराव उथळे यांनी हाती घेतला क्रीडा क्षेत्राबद्दल विशेष आपुलकी आस्था प्रेम व सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सातारच्या क्रिडा परंपरेला गुरुवर्य बबनराव उथळे यांनी खऱ्या अर्थाने सुवर्ण दिन प्राप्त करून दिले खेळाडूंनीही गुरुवर्य यांच्यावर मनापासून ऋणानुबंध जोपासले गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या परीसस्पर्शाने आमचे ही जीवन फुलले हे असंख्य खेळाडू सांगतात.

                                       श्रीरंग काटेकर 

                                  जनसंपर्क अधिकारी 

                         गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 13 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket