घोणसपूर प्रवेशद्वाराचे नूतनीकरण: ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारले रंगकाम.
प्रतापगङ:सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य घोणसपूर गावात ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचे रंगकाम पूर्ण केले आहे. “स्वयंभू श्री भैरी मल्लिकार्जुन देवस्थान, श्रीक्षेत्र मधू मकरंद गड” या शासनमान्य “क-वर्ग” दर्जा प्रमाणित तीर्थक्षेत्र यात्रास्थळाच्या प्रवेशद्वाराला यामुळे नवीन रूप प्राप्त झाले आहे.
या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या “वर्ग-क” दर्जा यात्रास्थळ तीर्थक्षेत्र म्हणून प्रमाणित करण्यासाठी विद्यमान आमदार मा. श्री. मकरंद आबा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. होळीच्या निमित्ताने मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांच्या उपस्थितीत सरपंच सौ. नंदा लक्ष्मण जाधव आणि ग्रामसेवक श्रीमती डांगे यांनी या कामाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या एकजुटीचे त्यांनी कौतुक केले आणि ग्रामपंचायती मार्फत घोणसपूर गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील श्री. अनाजी जंगम, श्री. महेश जंगम, श्री. किरण जंगम, श्री. बी. एन. जंगम, श्री. सुरेश जंगम, श्री. शिवराम जंगम आणि श्री. प्रकाश जंगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
घोणसपूरचे ग्रामदैवत स्वयंभू भैरी मल्लिकार्जुन देवस्थान हे अष्ट-शिवलयांपैकी एक प्राचीन स्वयंभू शिवमंदिर आहे. यापुढे शासकीय योजना तसेच सी.एस.आर. यांच्या माध्यमातून गावचा आणि अष्ट-शिवलयांच्या मंदिरांचा विकास व्हावा, तसेच अशा विकासातून पर्यटनाला चालना मिळावी, अशी इच्छा गावचे सुपुत्र श्री. रोशन जंगम यांनी व्यक्त केली.ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेले हे प्रवेशद्वाराचे रंगकाम गावाच्या सौंदर्यात भर घालणारे ठरले आहे.
