गौरीशंकरचे सुखात्मे स्कूल लिंब गुणवत्तेत ठरले अग्रेसर
सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
लिंब – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( सी.बी.एस.ई) बोर्ड नवी दिल्ली यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष सन 2023- 24 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत गौरीशंकरच्या डॉ.पी. व्ही सुखात्मे स्कूल लिंबच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करीत सलग 11 वे वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली यामध्ये अथर्व देवीदास बागल याने 96.40% मिळवून विशेष चमकदार कामगिरी करीत गणित व मराठी विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करून डॉ. पी .व्ही. सुखात्मे स्कूल लिंबच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे तर वैष्णवी विजय पाटील हिने 95% , वेदांगी प्रवीण पाटील हिने 88% , सुमित सुरेंद्र कुशवाह याने 87.40% गुण मिळवून स्कूलचा नांवलौकिक उंचाविला आहे तसेच सानवी नितीन पवार, प्राजक्ता सुखदेव मदने, विश्वराज जयवंतराव जाधव , गायत्री सचिन मोरे, ईश्वरी प्रशांत नागटिळक यांनीही गुणवत्तेत उल्लेखनीय कामगिरी केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर.प्राचार्या ङाॅ. नवनिता पटेल, घनश्याम चव्हाण, प्राध्यापक अमित मडके प्राध्यापिका शिल्पा भोसले नितीन शिवथरे राकेश खोपडे अदि प्रमुख उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, रती. जगताप यांनी अभिनंदन केले.
अथर्व देविदास बागलची उत्तुंग कामगिरी
अथर्व देवीदास बागल या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सी.बी.एस.ई बोर्डात गणित विषयात १०० पैकी शंभर व मराठी विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवून संस्थेच्या शैक्षणिक शिरपेचात त्याने मानाचा तुरा रोवून एक नवा इतिहास घडविला आहे असे मत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर यांनी व्यक्त केले