गौरीशंकरच्या चेतना स्कूलने सांस्कृतिक परंपरा जोपासली -ना.महेश शिंदे
चेतना स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रसिकजणांची मने जिंकली वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सातारा रोड – कलाविष्काराचे अनोखे दर्शन घडविताना गौरीशंकर च्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूल भक्तवडी मधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक परंपरेला साजेसे असे कला संस्कृती जोपासले आहे असे मत ना. महेश शिंदे यांनी केले ते सातारारोड (भक्तवडी) येथील यशोदीप मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या चेतना इंग्लिश मीडियम स्कूल भक्तवडीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालक प्रतिनिधी डॉ. सदाशिव जाधव ,सचिन बाबर ,जीवन जाधव ,सौ कविता पंडित, सौ आशा चतुर ,सौ तू तोशदा फाळके ,ज्येष्ठ नागरिक शंकर फाळके, गणेश जाधव, दीपक फाळके ,पैलवान भरत आवाडे, नारायण बर्गे अदि प्रमुख उपस्थित होते.
ना. महेश शिंदे पुढे म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ज्ञानाइतकेच कला कौशल्यास महत्त्व प्राप्त झाले आहे विद्यार्थ्यांनी कला संस्कृतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे या क्षेत्रातही करिअरची उत्तुंग संधी आहे.
प्रारंभी स्कूलच्या प्राचार्या सविता नलवडे यांनी स्कूलच्या वार्षिक कार्यप्रणालीचे वाचन केले सलग बारा वर्षे 100% निकालाची परंपरा राखणाऱ्या चेतना स्कूलने परिसरात स्वतःचे आगळे वेगळे स्थान प्राप्त केल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली .यावेळी विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स,, कॉकटेल डान्स, अदि सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाविष्काराचे सादरीकरण करून रसिकजणांची मने जिंकली. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
