गौरीशंकरचे सनशाईन स्कूल खटावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सलग बाराव्या वर्षी दहावीचा निकाल 100 टक्के
खटाव – ग्रामीण भागातील दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाचे ज्ञानकेंद्र ठरलेल्या गौरीशंकर ज्ञानपीठचे सनशाईन इंग्लिश मिडियम स्कूल खटावच्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई बोर्ड नवी दिल्ली यांनी शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा सलग बारा वर्षे कायम राखली आहे. यामध्ये आर्या सुहास जगदाळे 91 टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर जोया रसूल पठाण हिने 90. 06%, नम्रता विजय कदम 99.04%, अथर्व राजेंद्र झिरपे 89.02% व अनुष्का आनंदकुमार देशमुख 84.08% गुण मिळवून स्कूलच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचा नुकताच स्कूलमध्ये प्राचार्या प्रमिला टकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्या प्रमिला टकले म्हणाल्या की खटावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून विद्यार्थीचे परिश्रम व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्कूल शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप ,जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, कार्यालय अधीक्षक वैभव जठार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले
