गौरीशंकर मध्ये भारती पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
गौरीशंकरचे हितचिंतक व लिंब कॅम्पसचे भूमिपूजन केलेले दैनिक सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्याने गौरीशंकर लिंब कॅम्पस मध्ये भारती पवार यांच्या प्रतिमेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली गौरीशंकर आणि पवार कुटुंबियांशी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांचे स्नेहपूर्व संबंध असून सुरुवातीच्या काळात प्रतापराव पवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटात गौरीशंकर परिवार सहभागी असून भारती पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यावेळी गौरशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यानी भारती पवार यांच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितीना माहिती दिली यावेळी प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.




