गौरीशंकर देगाव फार्मसीची कोमल थोरातचे प्रोजेक्ट स्पर्धेत यश
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरी कडून विशेष दखल, २०० प्रोजेक्ट मधून कोमल थोरातच्या शेतीविषयक प्रोजेक्टची निवड
देगाव :- शेतीप्रधान भारत देशातील शेतकर्याचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी आधुनिकतेची कास धरून शेती व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव आता शेतकरी बांधवाना होवू लागली आहे. तोट्यातील शेती उद्योग फायदेशीर होण्यासाठी काळानुसार नविण्यपूर्ण यंत्रसामुगीचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे पांरपरिक शेती व्यसायला मूठमाती देवून स्पर्धाच्या युगात जलदगतीने शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी स्वतामध्ये आता आमुलग्र बदलाची कास धरून वाटचाल करणे गरजेचे आहे शेतीउत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी आधुनिक यंत्रसामुगी यंत्राच्या साहय्यानेच यापुढील काळात शेती करणे लाभदायक ठरणार आहे शेतकरी बांधवाची हि गरज ओळखून गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव मधील तृतीय वर्षात शिकणारी कोमल रामचंद्र थोरात या विद्यार्थिनीने शेतकरी बांधवासाठी नविन्यपूर्ण यंत्र प्रोजेक्ट) टेन इन वन मल्टिपर्पज अॅग्री इझी मशीन विकसीत केले आहे. या यंत्राच्या सहय्याने शेतीमधील जवळपास विविध प्रकरचे दहा कामे करणे आता शेतकऱ्यांना सुलभ जाणार आहे. यामध्ये नागरणीपासून ते मळणीपर्यंत विशेषता पेरणी, कोळपणी खत फवारणी, माती भरणे काढणे तण काढणे व आंतरमशागत या यंत्राद्वारे सहजपणे करता येणार आहे .कमी वेळेत अधिक उत्पादन क्षमता घेण्याबरोबरच मनुष्यबळाचा वापर हि कमीत कमी होणार आहे या प्रोजेक्ट यंञाची उपयुक्ततेची दखल डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरी यांनी घेतली आहे विद्यापीठात सादरीकरण केलेल्या 200 प्रोजेक्ट मधून कोमल रामचंद्र थोरात हिच्या प्रोजेक्टची निवड झाली तिने प्राप्त केलेल्या यशाबदल नुकताच तिचा सत्कार गौरीशंकरचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागेश अलूरकर,प्रा. स्पर्शी बांदेकर, प्रबंधक हेमंत काळे अदि प्रमुख उपस्थित होते .कोमल रामचंद्र थोरात हिला प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर,प्रा. स्पर्शी बांदेकर यांनी मार्गदर्शन केले .यशस्वी विद्यार्थ्यांनीचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक जयवंतराव साळुंखे ,आप्पा राजगे,प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले .